Insert title here

आमचे ब्लॉग

ट्रायकोडर्मा

शेतामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला, फळबागा, तेलबिया, कडधान्य व ऊस पिकांवर सुरुवातीसमर, खोडकुज हे आढळुन येते व बरेचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक माना टाकून नाश पावतात. या अश्या रोगांना कारणीभूत अशा विविध प्रकारच्या बुरशी असतात ज्यामध्ये फ्युजारीयम, व्हटीसीलीयम, रायझोक्टोनिया स्क्लेरोसियम, फायटोप्योरा, पिथीयम या पिकांवर हल्ला करतात त्यामुळे उगवणारी रोपे रोगट उगवतात. यावर नियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करण्यात आला पण त्याने जमिनीचा पोत कमी झाला असून जमिनीतील जीवाणु ही नष्ट पावले. त्यासाठी पर्याय म्हणून जैविक ट्रायकोडर्मा हा उत्तम पर्याय आहे. * फायदे: १) बिजप्रक्रिया केलयाने उगवण क्षमता वाढते . २) मुळकुज , मर , खोडकुज या सारख्या रोगावर नियंत्रण ठेवते. ३) जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत करते . * प्रमाण: १) बीजप्रक्रिया - ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा/ १ किलोग्रॅम बियाणे . २) मातीप्रक्रिया - १ ते २. ५ किलोग्रॅम ट्रायकोडर्मा/ ३० किलोग्रॅम कुजलेले शेणखत . ३) द्रावणाद्वारे ( फळबागांसाठी ) - १० ते १५ ग्रॅम ट्रायकोडर्मा / १ ली. पाणी. .
Insert title here