Insert title here

उत्पादने

आम्ही काय करतोय

का आम्हाला निवडावं

आमच्या सेवा

आम्ही काय करतोय

सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात. त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क तयार केला जातो. दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे .

सेंद्रिय ह्युमिक मधील घटक

शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पाहणे गरजेचे आहे. या सर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी सेंद्रिय ह्युमिकचा वापर करणे आवश्यक आहे. सेंद्रिय ह्युमिकचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे . सेंद्रिय ह्युमिक म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे. सेंद्रिय ह्युमिक हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे. हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.सेंद्रिय ह्युमिकमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.सेंद्रिय ह्युमिक हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते. सेंद्रिय ह्युमिकच्या वापरामुळे वनस्पती मध्ये फळ आणि फुले वाढते, मातीची प्रजननक्षमता वाढवते ,वनस्पती चयापचय क्रियाकलाप व उत्पन्न वाढवते .

सेंद्रिय ह्युमिकचे फायदे

सेंद्रिय ह्युमिकमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते. मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते. ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते. सेंद्रिय ह्युमिकचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते. ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात सेंद्रिय ह्युमिकचा वापर खुप महत्वाचा आहे. जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते. याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात. बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.सेंद्रिय ह्युमिकच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते. सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.

दशपर्णी मधील घटक

दशपर्णी अर्कास शेतीत खूप महत्वाचे स्थान आहे .नावाप्रमाणे या अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे . दशपर्णी मधील ग्लिसिरीन मुळे झाडांच्या मुळाची वाढ चांगली होते ग्लिसिरीनमुळे शेतीचा सामू चांगला होण्यास मदत होते आणि पीकांची जोमाने वाढ होते. तसेच हे नायट्रेट आणि फॉस्फरस प्रमाण वाढवण्याचे काम करते . दशपर्णी मधून विविध प्रकारची मिनरलस पिकांना मिळतात ज्यांच्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत मिळते . उदा - नायट्रेट,सल्फर ,लोह,फॉस्फरस , इ . डाळींब बागां मध्ये क्वालिटी वाढवणासाठी आणि डाळींबाला दाट रंग व चकाकी येण्याकरता दशपर्णी चा उपयोग होतो .दशपर्णी च्या वापरा मुळे थ्रिप्स, माईट, कीड , अळी ,तेलया, करपा, मर, प्लेग ,फ्लावर ड्रॉपिंग इ. रोगा वरती नियंत्रित करीता येते. ऊस,भेंडी ,कांदा ,शेवगा ,वांगी ,मका,आल, हळद, भात व अनेक पालेभाज्या यासाठी सेंद्रिय दशपर्णी अर्कचा वापर करावा .पिकांना दर्जेदार बनवण्याचे आणि भरघोस उत्पन्न देण्याचे कामे हे दशपर्णी अर्क करते .

दशपर्णी चे फायदे

दशपर्णी अर्कत दहा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा पाला यात वापरला जातो . दशपर्णी सगळ्या प्रकारच्या किडी व पहिल्या अवस्थेतील अळ्या यांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी सेंद्रिय कीटकनाशक आहे . दशपर्णी मुळे मुळाची वाढ चांगली होते व पानांची काळोखी आणि पाने जाड व पसराट होतात.दशपर्णी मुळे रोग व किडींचे प्रकटन होऊन पिकांना नवचैतन्य प्राप्त होऊन ते लवकर रोगमुक्त होतात ,दशपर्णीमुळे पिके सुदृढ सक्षम व निरोगी होतात. दशपर्णीमुळे उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या क्वालिटी मध्ये वाढ होते .पिकांच्या क्वालिटी व उत्पादना करिता दशपर्णीचा हमखास वापर होतो . दशपर्णी चे द्रावण तयार करताना त्यात कसलेही रसायन जसे की स्प्रेडर, स्टीकर, वेटिंग एजन्ट, इन्सेक्टरीसाईड, पेस्ट्रीसाईड, सायट्रीक ॲसिड किंवा साबणाचे पाणी असे काही मिसळू नये .नुसत्या पाण्यात दशपर्णीचे द्रावण तयार करून फवारावे ,दशपर्णी चा वापर १२ हि महिने करावा . दशपर्णी चा वापर फळबागांसाठी त्याचे प्रमाण १०० ली. पाण्यातून २ ते २.५ ली.घ्यावे व पाले भाज्यांसाठी प्रती ली.२ ते २.५ मि.ली. घ्यावे आणि दशपर्णीचे २ ते ३ फवारण्या दर ४ ते ५ दिवसांच्या अंतरांनी घ्याव्यात. फवारणी दाट व चपचपून घ्यावी.
Insert title here
Insert title here